आयुष्यात असे अनेक चौकीदार येतात

एक मुलगा एका अलिशान गेटसमोर सायकल उभी करतो ..गेट जवळ जाऊन विचारतो …मामा इकडे नक्की काय आहे ?? गेटवरील माणूस पोरा हे सायकल वरून येणाऱ्या लोकांच्या साठी नाही ..उलट इथे अलिशान चार चाकीतून लोक येतात आणि मग आत जाऊन सायकल भाड्याने घेऊन व्यायाम करतात …तो मुलगा ..सायकल साठी फक्त इथवर …पोरा नुसती सायकल नाही तर सगळे महागडी इनडोयर गेम्स , क्रिकेट , स्विमिंग पूल , गोल्फ , रायफल शूटिंग , अस भरपूर आहे …चल तुझ्या कामाचे नाही …आज आलास परत अस विचारायला येऊ नकोस ..इथे कुठून कुठून मोठी लोक येतात ..नशीब कुठली गाडी आली नाही ..नाहीतर तुझ्या मुळे मला नाहक शिव्या पडल्या असत्या …काढ तुझी सायकल ..आणि काय रे एवढे एकदम विचारावेसे का वाटले ?? कोण आहे तरी तू …

काही वर्ष नंतर एक कार त्याच गेटजवळ थांबते ..त्या कार मधून एक जण उतरतो …गेटजवळ जातो ..आतून साहेब तुम्ही का उतरलात गेट उघडत होतो ….आताच सचिन सरांचा आलेला फोन की लाल गाडीतून जे येतील त्यांना आत पाठव ..

मामा आपण बसा मी उघडीन दरवाजा ..कारण ज्या साठी आजवर पळापळ केली आहे ती मला आज माझ्या आई , बाबांना आणि बायको मुलाला स्वतः उघडून दाखवायची आहे ..आपण फक्त सचिन सरांना फोन करा की मी आलोय …

ती व्यक्ती दरवाजा उघडते , कार मध्ये बसून कार त्या गेटच्या आत प्रवेश करते ..एका अलिशान निसर्ग रम्यसर्व ठिकाणी हिरवळ असलेल्या जागेत ती लाल गाडी प्रवेश करते …समोर एक जण असतो तो खुणेने सांगतो पार्कींग क्लब मेम्बर्स ओन्ली …

एका मोठ्या लॉबी मध्ये ती व्यक्ती आपल्या आई , बाबांना , बायको लहान मुलाला घेऊन प्रवेश करते ..एक व्यक्ती हसत हसत त्यांच्या समोर येतो ..गुड मॉर्निंग आशिष सर अगदी म्हटल्या प्रमाणे 10 ला पोहोचलात …सर येतीलच तोवर आपण पूर्ण क्लब फिरून घेऊ …

हो तो मुलगा म्हणजे मीच आशिष अनिल फाटक , कॉलेज झाले होते , एक कॅम्पिंग साईट मी पूर्णतः म्यानेज करीत होतो , कॅटरिंग , मार्केटिंग त्या वेळी ही जागा कशी आहे हे पहायला 8 वर्ष पूर्वी आलेलो ..साध्या सायकल मुळे त्या गेटच्या पलीकडची जागा बघू दिली नव्हती …मनाला लागले नाही ..एवढेच जाणवले की आपल्याला पल्ला खूप गाठायचा आहे , निराश हताश होऊन बसण्यापेक्षा ह्याच जागेत मानाने कसे येऊ ह्या साठी माझ्या कामात बदल केले ..त्याचे हे श्रेय ..एक वर्ष नव्हे तर 5 वर्ष साठी एकही रुपया न भरता त्या क्लबची मेम्बर्स शिप मिळाली ..ती पण पूर्ण फॅमिली ची ..

अर्थात हे साध्य झाले त्या चौकीदार मामाच्या मुळे …

आयुष्यात असे अनेक चौकीदार येतात , काही रोखतात काही टोकतात अगदी काही मानसिक त्रास पण देतात ..जर आपले धेर्य पक्के असेल ..तर त्या त्या चौकीदार साठी आपली व्यूह रचना ( कामाची बदलायची ) नक्कीच यश येईल आणि जर यश नाही आले तर और एक चान्स है ..अस मनाला म्हणत लागायचे कामाला …

जोरात धावणारी गाडी साध्या स्पीड ब्रेकर ने तिची गती मंदावते परत गतिशील होते अर्थात त्या गाडीचा चालक जसा असेल त्यावर ..आपण आपल्या विचारांच्या गतीला गाडी च्या चालका प्रमाणे कंट्रोल करायचे …

माझं एकच ब्रीद वाक्य आहे ..
राग नसावा मैत्री असावी ..

©आशिष अनिल फाटक , कल्याण

Contact Details

Click to reveal phone number.

आशिष अनिल फाटक
Address:
Kalyan, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!