ग्रेटभेट उद्योजकांची मुलाखत सदरात सगळ्यांचे स्वागत आज पुण्यातील एका महिला उद्योजिका त्यांच्या बाबत जाणून घेऊया …
उद्योजिका: Meita Padalkar
ब्रँड: Meeta Collection
स्थान: घरून व्यवसाय – डीएसके विश्व, धायरी, पुणे**
—
आशिष फाटक: नमस्कार मीता ताई! आपण ‘Meeta Collection’ या नावाने घरून व्यवसाय करत आहात. कृपया थोडं तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा.
मीता पाडळकर: नमस्कार! मी ‘Meeta Collection’ या नावाने घरूनच *Home Textile आणि Home Décor* या क्षेत्रात काम करते. मुख्यतः *डबल/सिंगल बेडशीट्स आणि डोहर्स* यांचा समावेश आहे.
आशिष: या व्यवसायाची सुरुवात कशी झाली?
मीता: सुमारे १५ वर्षांपूर्वी या व्यवसायाची सुरुवात केली होती – मध्ये काही काळ थांबावं लागलं, पण आता पुन्हा जोमाने काम करतेय. घर, मुलगा, आणि जबाबदाऱ्या सांभाळून घरून करता येणारा एक चांगला आर्थिक आधार म्हणून याची निवड केली.
आशिष:तुमचं उत्पादन इतरांपेक्षा वेगळं कसं आहे?
मीता: मी दर्जेदार फॅब्रिक, चांगली क्वालिटी, आणि वाजवी दरात ग्राहकांना उत्पादने देते. ग्राहकाभिमुख दृष्टिकोन हे माझं बलस्थान आहे. प्रत्येक घरात बेडशीट लागतेच, त्यामुळे ही एक उपयोगी आणि गरजेची वस्तू आहे – सर्वांसाठी.
आशिष: सध्या कोणत्या प्रकारच्या उत्पादांची सर्वाधिक मागणी आहे?
मीता: डबल बेडशीट्स आणि डोहर्स यांना सर्वाधिक मागणी आहे. आता मी सगळ्या प्रकारच्या डिझाईन आणि व्हरायटीसाठी ग्राहक शोधतेय.
आशिष: सध्या विक्री कोणत्या माध्यमांतून करता?
मीता: मी सोसायटी व्हॉट्सॲप ग्रुप्स, फेसबुक, इंस्टाग्राम, आणि एग्झिबिशन स्टॉल्स या माध्यमांतून विक्री करते. अजून वेबसाईट नाहीये, पण भविष्यात त्याचा विचार आहे.
आशिष: कुटुंबाचा पाठींबा कसा आहे?
मीता: माझे पती आणि मुलगा दोघेही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळेच मी हे सगळं करू शकतेय.
आशिष: शेवटी, तुमचा उद्देश काय आहे?
मीता: ग्राहकांना परफेक्ट बेडिंग सोल्युशन देणे आणि दर्जेदार उत्पादनं परवडणाऱ्या दरात देणे – हाच माझा मुख्य उद्देश आहे.
आशिष फाटक यांच्याकडून एक नम्र नमस्कार – अशा मेहनती गृहिणींनी उद्योजिकांमध्ये रूपांतर होणं हीच खरी प्रेरणा आहे!

Click to reveal phone number.
Meeta Collection – Meeta Padalkar
Address: DSK Vishwa, Dhayri, Pune Maharashtra.
Submit your review | |
1 2 3 4 5 | |
Submit Cancel |