हील युवर इनर चाईल्ड टेक्निक

“बाई पण भारी देवा” ही मूव्ही आज आपल्या सर्वांची आवडती मूवी आहे ,पण मी एक माईंड थेरपिस्ट या नात्याने, त्यातील एक माईड टेक्निक तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

एका सीन मध्ये (रोहिणी) ताई, आपल्या डिलिव्हरीत आपलं मूल गमावते, बहिणीच्या बाळाच्या बारशाला जाते आणि तिथे असंख्य बायकांच्या नजरेतून स्वतःला दूर करत एका रूम मध्ये स्वतःला बंद करून घेते ,एक अपशकुन या नजरेने बघणाऱ्या महिला आणि आपली बहीण आपल्याला पहात ही नाही विचारतही नाही ती ही जसे काही आपल्याला अपशकुन समजत आहे अशा या सर्वांच्या नजरेतून ती दूर दूर स्वतःला कोंडून घेते.आणि कित्येक वर्ष ती त्या वेदनातून जात असते,रोजचे रुटीन चालत असतानाच एकदम तिला त्या आठवणी घेरत असतात आणि ती तिथेच स्तब्ध होत असते, ती कधीच कुठल्याही काउन्सलर कडे जाण्यासाठी तयार नसते, ती हमेशा म्हणत असते मी वेडी नाहीये, मी वेडी नाहीये आणि मला काही गरज नाहीये कौन्सिलची. आणि तिचे पतीदेव तिला त्यांच्या मित्राकडे घेऊन जातात आणि ती मंगळागौरच्या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना स्वतःच्या प्रॉपर काउन्सलिंग साठी तयार होते पहिले ती बिलकुलच रेडी नसते , त्यांच्या कडे जात असते पण त्यांना रिस्पॉन्स देत नसते आणि त्यामुळे तिला रिझल्ट ही दिसत नव्हता.आणि किती ही मोठा counselor असेल तरी client थोडा तरी तयार असणे गरजेचे असते.पण जेव्हा ती रिस्पॉन्स द्यायला चालू होते तेव्हा कौन्सिलर तिला तिच्या भूतकाळाच्या त्रासदायक आठवणी मध्ये घेऊन जातात, आणि तिला दाखवतात की ती स्वतः तिच्या पास्ट मधील जयाचा हात पकडून बारशाच्या कार्यक्रमात घेऊन जाते आणि आपल्या बहिणीच्या बाळाला ती त्या भुतकाळातील जयाच्या हातामध्ये देते आणि तिला विश्वास देते की तू खूप शुभ आहेस,अपशकुन वगैरे असं काही नाही, तुझ्या असण्याने सर्वजण महिला खुश होत आहेत आणि भूतकाळातील जयाच्या चेहऱ्यावर हसू खुलते,ती खुप खुश होते.आणी नंतर जया वर्तमान मध्ये येते. आणी या प्रक्रियेलाच माईड टेक्निक्स मध्ये हील युवर इनर चाईल्ड टेक्निक म्हटले जाते.

Rajshri Mind & Wellness Center चा उगम होण्यामागचे कारण माझ्याकडे एक पेरेंट्स आले होते त्यांची मुलगी कोणताही पुरुष जवळ आल्यानंतर खूप रडायची खूप रडायची म्हणजे ते पूर्ण घरातले लोक हादरून जायचे समजत नव्हतं की काय कारण आहे असं कुठली घटनाही घडली नव्हती असं तिच्या पेरेंट्सने मला सांगितलं होतं परंतु ही खूप भयानक, धक्कादायक गोष्ट होती ती तिच्या वडिलांना, मोठ्या भावाला, मामाला अशा जवळच्या नातलगांना सुद्धा खूप लहान असल्यापासून जवळ आलं की खूप भयानक रडून त्रास करून घ्यायची .या मुलीसाठी & आमच्या नात्यातील मुलासाठी मी ह्या टेक्निक्स शिकल्या.

जर आपल्या शरीरात कोणताही आजार असेल आणि आपल्याला तो ठीक करायचा असेल तर आपल्याला आपल्या मनालाही त्यामध्ये एंगेज करणे गरजेचे आहे, यासाठीच मी तुमच्यासोबत खूपच मस्त टेक्निक शेअर करते आहे,आपल्या इनर चाइल्डला हिल करण्यासाठी आपल्या अवरनेस मध्ये आपण आपल्या बालपणात जायचं तिथे आपल्या इनर चाइल्डला ला भेटायचं ,पाहायचं तो काही नाराजगी व्यक्त करतोय का? ,तो काही रागामध्ये आहे का?, कुठल्या trauma /आघात मध्ये आहे का?, काही हादसाचा शिकार झाला आहे का ?आणि जर हो असेल तर, सर्वात पहिल्यांदा त्याला आपल्या मिठीमध्ये घ्यायचं ,त्याच्यासोबत बोलायचं, हळूहळू हळूहळू त्याला विश्वास द्यायचा, जसे की आपण त्याचे पेरेंट्स आहोत आणि आपण त्याचं भविष्य नेहमीसाठी खूप छान करीत आहोतअसा त्याला विश्वास द्या ,आपण त्याची सर्व खुशी ,आनंद वापस घेऊन आणून देत आहोत, वापस करत आहोत. आणि तुम्ही हळूहळू पहाल की त्या चाइल्ड चे स्टेट ऑफ माईंड बदलत आहे, ज्यावेळेस तो खूप खुशी अनुभवत असेल तेव्हा तुम्ही त्याला घेऊन वर्तमान मध्ये येणार.

अशा माईंड थेरपीचा उपयोग आपण आपल्या बालपणातील मतभेद, भावाभावांमध्ये जलसपणा मुळे, बऱ्याचदा पेरेंट्स कळत नकळत एकाला खूप लाड करतात आणि नकळत दुसऱ्या मुलाच्या बालमनावर खूप आघात होतो ,आणि तीच भावाना त्याला मोठेपणी एका नफरत चे स्वरूप घेऊन सामोरे जावे लागते, आपल्या सख्या भावाचे ते वैरी होतात,त्यावरती ही टेक्निक काम करते .

काही मुलींना आज खूप ऐकण्यात येते अत्याचाराला सामोरे जावं लागतं ज्यात त्यांची काही चूक नसते पण आयुष्यभर त्या, त्या त्रासातून जात असतात , स्वतःवर नफरत करायला लागतात ,सेल्फ लव्ह पूर्णपणे नष्ट झालेले असते, आणि त्यातून त्यांना भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.त्यांच्यासाठीही हिल युवर इनर चाइल्ड टेक्निक खूप काम करते.

तसेच फोबिया, fear याची ही सुरुवात /याची जड ही बालपणात च असते/ सापडते.

आणि ही टेक्निक मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करताना खूप आनंद झाला मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही शेवटपर्यंत हा लेख वाचलात, खूप खूप धन्यवाद.🙏🏻🙏🏻😊

Rajashri Mind & Wellness Center

Contact Details

Click to reveal phone number.

Rajashri Mind & Wellness
Address:
Kamal appartment,
ground floor, Near madhumira function hall,
kokate nagar Latur, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!