आनंदवन -हेमलकसा -सोमनाथ -ताडोबा(महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्‍ह्यातील वरोरा तालुक्‍यात कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी आनंदवन नावाचा आश्रम सन १९५२ साली बाबांनी स्थापना केली. कुष्ठरोग्याची सुश्रुषाच नव्हे तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यामातून बाबांनी केली. आश्रमात केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूक बधीरांसाठी विशेष शाळा देखील तेथे काढल्या आहेत. कुष्ठरोग्यासाठी उपचार प्रशिक्षण व पुनर्वसन या करीता रुग्णालयाची व अन्‍य प्रकल्‍पाची स्‍थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाची स्थापना केली तसेच व्यवसाय प्रशिक्षण सुरू करुन आर्थिक स्वावलंबन मार्ग दाखवला पाहिजे. बाबांनी अत्‍यंत प्रतिकूल परिस्‍थिती असूनही प्रचंड जिद्दीनी आपली कामे पूर्तत्वास नेली. भामरागड तालुक्‍यातील आदिवासीच्‍या विकासासाठी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्‍प सुरू केला.

दुर्गंम भागातील निसर्गाच्या सान्निध्यात माडिया आणि गोंड या अतिमागास आदिवासी मधील माणूस जगवण्याचे हे प्रयत्न २३ डिसेंबर १९७३ रोजी ज्येष्ठ समाज सेवक स्व.बाबा आमटे यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली आणि एप्रिल १९७४ मध्ये बाबा आमटेंचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदा यांनी आदिवासींसाठी दवाखाना सुरु केला डॉक्‍टरांनी फक्‍त अजारच बरे केले नाहित तर त्या आदिवासींना हे बिंबवण्यात आले कि आजार हे तांत्रिक आणि मांत्रिकाने बरे होत नाहीत तर ते डॉक्टरांचे औषधाने बरे होतात अशाप्रकारे *आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळे प्रकल्प गेली ४० वर्षापासून अखंड पणे लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यामातून सुरु आहेत. लोक बिरादरी मध्ये डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाथ प्राण्यांसाठी संग्रहालय सुरु केले. त्याला नाव दिले ‘‘प्राण्यांचे अनाथालय’’ असे नामकरण केले या मध्ये सात आठ जातीचे कुत्रे, बिबटे, रानडुकरे, अस्‍वल, पट्टेरी मण्यार, घोणस, अजगर, साळींदर, शॅमेलीऑन, शेकरु इत्यादि अनेक प्राण्यांचा त्यात समावेश आहे. त्या प्राण्यांवरील डॉ. आमटे यांचे प्रेम व आपुलकी बघून भारावून जायला होते. या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवा करिता लोकबिरादरी प्रकल्‍प जणू अरण्यातील प्रकाशाची वाट ठरल्याची अनुभूती येथे भेट दिल्यावर लक्षात येते. त्याच प्रमाणे बाबांनी सोमनाथ (मूल) या ठिकाणी ही उपचार व पुनर्वसन केंद्र स्थापन केले आहे. सोमनाथ हे १२५० एकरवर बसलेले आहे. यथे मानवनिर्मित बंधारे व तळी निर्माण करून शेतीच्या माध्यमातून विकास साधला आहे.
म्हणुनच बाबांच्या कल्पनातीत कार्याच्या कर्मभूमीला भेट, तसेच सेवामयी जीवनाच्या अरण्यातील प्रकाशवाटा पाहणे त्याचप्रमाणे ताडोबा जंगल सफारी व ओळख असा एकत्रित लाभ घेणे म्हणजे वेगळाच अनुभव ठरेल.

दिनांक-:
22/09/24 ते 28/09/24
05/10/24 ते 11/10/24
17/11/24 ते 23/11/24
01/12/24 ते 07/12/24
15/12/24 ते 21/12/24

सहल खर्च : ₹ 21,750/-

विशेष सूचना:
५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा.

सहलीचा कार्यक्रम:
१ ला दिवस : मुंबई-नागपूर-आनंदवन
रात्री सी. एस. टी. एम. मुंबई येथून नागपूर दुरांतो ट्रेनने नागपूरकडे प्रयाण, रात्रीचा प्रवास ट्रेनमध्ये.

२ रा दिवस : नागपूर- आनंदवन
सकाळी ७. २० वाजता नागपूर येथे आगमन , प्रवासामध्ये नाष्टा करून आनंदवन येथे आगमन , विश्रांतीनंतर आनंदवनातील निरनिराळ्या प्रकल्पांना भेट व रात्री मुक्काम आनंदवन.(B/L/D)

३ रा दिवस : आनंदवन-हेमलकसा
सकाळी आनंदवनच्या इतर प्रकल्पांना भेट . व श्रद्धेय बाबा आमटे यांच्या समाधी स्थळाला भेट , आनंदवन निर्मित वस्तूंच्या विक्रीकेंद्राला भेट. दुपारी ११. ३० वाजता जेवण करून लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा ) येथे प्रयाण. संध्याकाळी ४ वाजता आगमन , रात्री मुक्काम हेमलकसा (B/L/D)

४ था दिवस : हेमलकसा-सोमनाथ
सकाळी डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर ओळख व चर्चा , अनाथ प्राणिसंग्रहालयाला व उर्वरित प्रकल्पांना भेट. दुपारी १२ वाजता जेवण करून सोमनाथ कडे प्रयाण , आगमन , रात्री मुक्काम सोमनाथ.(B/L/D)

५ वा दिवस : सोमनाथ- ताडोबा
सकाळी मानव निर्मित बंधारे व तळी तसेच भात शेती , भाजीपाला , फळे उत्पादन प्रकल्पास भेट व माहिती घेऊन दुपारी ताडोबा कडे प्रयाण व दुपारी जंगल सफारी करून ताडोबातील हॉटेलमध्ये आगमन (B/L/D)

६ वा दिवस : ताडोबा-नागपूर
सकाळी जंगल सफारी करुन नागपुरला प्रयाण व आगमन , रात्री रेल्वेने मुंबईकडे प्रयाण. (B/L)

७ वा दिवस : नागपुर-मुंबई
आनंदी व अविस्‍मरणीय आठवणींसह मुंबई येथे आगमन.

ग्रुप सवलत : (५ किंवा जास्त लोकांच्या ग्रुपने सवलत (Discount) दिली जाईल.

– अनमोल पर्यटन

Contact Details

Click to reveal phone number.

Anmol Paryatan
Address:
Pune, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews
error: Content is protected !!