एवढे स्वस्त डिलिव्हरी चार्जेस ? तुम्हाला माहीत आहे का?

आमच्या फेस्टिवल स्पेशल स्कीम ग्राहकांना प्रत्यक्षात फक्त रू. 25/किलो ते रू. 16/किलो ईतकेच डिलीव्हरी चार्जेस लागतात!

काय म्हणता? कसे काय?

अहो, पहिल्या एक किलोला फक्त रू. 40 आणि त्यापुढील वजनास रू. 10/किलो .
आता तुम्हीच पहा ना:
2 किलोच्या पार्सलला एकूण रू 50 (प्रत्यक्ष रेट पडतो ₹ 25/किलो),
3 किलोच्या पार्सलला एकूण रू 60 (प्रत्यक्ष रेट पडतो ₹ 20/किलो),
4 किलोच्या पार्सलला एकूण रू 70 (प्रत्यक्ष रेट पडतो ₹ 17.50/किलो),
5 किलोच्या पार्सलला एकूण रू 80 (प्रत्यक्ष रेट पडतो ₹ 16/किलो),
आणि जसे पार्सलचे वजन वाढते, तसे तसे प्रति किलो डिलीव्हरी चार्जेस कमीच होत जातील ना!

काय म्हणता!

सणासुदींच्या दिवसात, पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये सर्वत्र, सेम डे लोकल डिलीव्हरी – 1 किलो साठी- फक्त 40 रूपयांत!

होय!स्टाॅर्क डिलीव्हरी सर्व्हिस देत आहेत: पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये सर्वत्र, एकाच रेट मध्ये, सेम डे डिलीव्हरी, किफायतशीर दरात, सेफ आणि विश्वासार्ह सर्व्हिस!

आता, या सणासुदीच्या काळात तुम्ही फक्त उत्पादन आणि सेल्सवर लक्ष केंद्रित करा, डिलीव्हरी ची जबाबदारी आमच्यावर सोपवून त्या बाबतीत निर्धास्त व्हा!

सर्व ग्राहकांना स्टाॅर्क डिलीव्हरी सर्व्हिस तर्फ गुरू पौर्णिमा आणि येणाऱ्या चातुर्मासातील सणांसाठी हार्दिक शुभेच्छा.

या कालावधीत श्रावण महिन्यापासून गौरी गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळी, हे सर्व सण कव्हर होतात.

आनंदाची गोष्ट म्हणजे या 23 जुलै 2024 ला आपली “स्टाॅर्क डिलीव्हरी सर्व्हिस” 3 वर्षे पूर्ण करत आहे.

या निमित्ताने, खास व्यावसायिक ग्राहकांसाठी आम्ही एक “फेस्टिव्हल डिस्काउंट स्कीम” जाहीर करत आहोत. या स्कीम चे डिटेल्स, तसेच नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.

A) यासाठी ग्राहक व्यावसायिक असावा आणि त्यांनी आमच्याकडे (स्टाॅर्क डिलीव्हरी सर्व्हिस) रजिस्ट्रेशन केलेले असावे. रजिस्ट्रेशन फी रू 100/- आहे. रजिस्ट्रेशन फक्त एकदाच करावे लागते.
ज्यांनी रू. 100/- भरून रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
B) ही स्कीम 17 जुलै 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत लागू असेल (चातुर्मासाचे 4 महिने + ग्रेस पिरीयड).
C) या स्कीममध्ये सहभागी ग्राहकांना, या कालावधीत दिलेल्या डिलीव्हरी ऑर्डर्ससाठी खालील प्रमाणे डिलीव्हरी चार्जेस लागू राहतील.
# पहिल्या एक किलोला रू. 40.
# ग्रेस वजन 125 ग्राम पर्यत धरले जाईल. म्हणजे 1125 ग्राम ला एक किलोचा चार्ज लागेल, पण 1130 ग्राम वजन असेल तर 2 किलोचा चार्ज लागेल.
# एक किलो पेक्षा जास्त वजनास: रू. 10/किलो.
D) स्कीम फी रू. 2500/- परत न मिळणारी (Non Redundable)असेल.
E) स्कीम कालावधीत किती ऑर्डर कराव्या यावर काही बंधन नाही.
F) या स्कीम अंतर्गत नोंदणी आजपासून सुरू करीत आहोत.
रजिस्ट्रेशन फी रू 100 + स्कीम फी रू. 2500 असे एकूण रू. 2600/- भरून सदस्य होऊन स्कीमचा फायदा घेणे सुरू करू शकता.
# आधीच रजिस्ट्रेशन फी भरलेल्या सदस्यांना पुन्हा रू 100 भरायची गरज नाही, त्यांनी फक्त स्कीम फी रू. 2500 भरायची गरज आहे.
# खास सूचना: आमच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त आज 17 जुलै ते 23 जुलै 2024 च्या रात्री 12 वाजेपर्यंत या स्कीम साठी नोंदणी करणाऱ्या सदस्यांना 10% सवलत देण्यात येईल म्हणजे तुम्ही फक्त रू 2350/2250 भरून स्कीम चे सदस्य होऊ शकता.
## सर्व पेमेंट साठी आमचा गुगल पे/फोन पे नंबर आहे
### आपण पेमेंट केल्यावर पेमेंट स्क्रीन शाॅट सह खालील माहिती नंबर वर व्हाॅटस्अप करावी.
1. तुमचे/सदस्याचे पूर्ण नाव,
2. सदस्याचा पूर्ण पत्ता
3. संपर्कासाठी मोबाईल नंबर
4. प्राॅडक्ट काय आहेत.
5. पेमेंट डिटेल्स: स्कीम फी + रजिस्ट्रेशन फी.

G) या स्कीम साठी नियम व अटी:
1. केक, केटरिंग, फ्रोजन फूड ऑर्डर्स तसेच बाहेरगावी पाठवण्यात येणाऱ्या कुरियर साठी ही स्कीम लागू नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
तसेच, ही स्कीम फक्त लोकल डिलीव्हरी ऑर्डर्ससाठीच लागू असेल.
अर्जंट, एक ते तीन तासात डिलीव्हरी ऑर्डर्स साठी ही स्कीम लागू नाही.
2. या स्कीम सोबत ईतर कोणतेही सवलतीचे रेट किंवा स्कीम घेता येणार नाही.
3. या स्कीम मधून बुकिंग केलेल्या ऑर्डर्स चे दैनंदिन डिलीव्हरी चार्जेसचे पेमेंट दुसऱ्या दिवशीच करणे आवश्यक आहे.
तीन वेळा लेट पेमेंट झाले तर सदस्यता रद्द करण्यात येऊ शकते आणि स्कीम फी परत मिळणार नाही.
4. या स्कीम मधील ऑर्डर्स डिलीव्हरी फक्त आमच्या ऊपलब्ध कव्हरेज एरियातच करता येतील.
5. जर एखाद्या दिवशी, एकाच सदस्याच्या/व्यावसायिकाच्या 5 पेक्षा जास्त ऑर्डर्स असतील तर आदल्या दिवशी/एक दिवस आधी कळवावे, म्हणजे नीट प्लॅन करता येईल.
6. दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स चे बुकिंग किमान 7 दिवस आधी करावे, नाही तर लोड जास्त असल्यास काही ऑर्डर्स नाकारल्या जाऊ शकतात, याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.
7. पॅकेजिंग ही ग्राहकांची जबाबदारी आहे. त्यामुळे पॅकेजिंगमुळे काही तूट फूट झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेत नाही.
8. एका रजिस्ट्रेशनवर फक्त एकच व्यावसायिक आम्हाला डिलीव्हरी ऑर्डर्स देऊ शकेल.

Stork Delivery Services

Contact Details

Click to reveal phone number.

Stark Delivery Service
Address:
Pune, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!