Aditya Bhagwat – Horoscope Consultant

A31122023
सुलेखाचे (नाव बदलले आहे) कुठे जमता जमत नव्हते, तिच्या आईवडीलांनी तिची कुंडली आधीच दहा ठिकाणी दाखवून झाली होती. कोणीतरी त्यांना वास्तूत दोष असेल असे सांगितले. त्यांनी कुठूनतरी माहिती काढून मला बोलवले.

सुलेखा नैॠत्य दिशेला झोपायची आणि तिचे आईवडील ईशान्य दिशेला झोपायचे. अनेक वर्षे असेच चालू असल्याने त्या दिशांचे प्रभाव खुप पक्के झाले होते. ते सहजासह्जी काढून टाकणे शक्य नव्हते. मी त्यांना विचारले “घरात सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत का?” तसे सुलेखा माझ्याकडे संशायाने बघू लाग़ली. तिच्या आईवडीलांच्या चेहऱ्यावर देखील “कुठून हि अवदसा घरी बोलवली” असे भाव उमटले.

मला देखील मी काहितरी मोठा घोळ केल्यासारखे वाटले पण मी शांत राहून त्यांना सांगितले “स्त्रियांमध्ये दर महिना हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी सोन्याचे दागिने कमरेच्या वरती आणि चांदिचे दागिने कमरेच्या खाली स्त्रियांनी घालायचे असतात. आज़काल दागिने घालून बाहेर फिरणे शक्य नाही पण निदान घरात असताना स्त्रियांनी काहि तास दागिने वापरले तर त्यांच्याच प्रकॄतीला फायदा होईल. यासाठी विचारले, तूम्ही मला हिशॉब देण्याची गरज नाही पण असतील तर सुलेखाच्या अंगावर घालत जा.”
हे ऐकून झाल्यावर त्यांना थोडे हायसे वाटले, मी पुढे बोलायला सुरुवात केली “सुलेखा कपाळाला कूंकू किंवा टिकली लावत जा.”

आता तिला मी भिडे गुरुजी झाल्यासारखे वाटले पण मी तिला सांगितले “केवळ परंपरा म्हणून अजिबात लावू नकोस किंवा कोणीतरी सांगतो म्हणून लावू नकोस. तू स्वतः एकदा टिकली किंवा कूंकू लावून बघ तूझ्या सौंदर्यात वाढ होते असे तूला वाटले तर लावत जा.”

माझे म्हणणे तिला पटले, स्त्रियांनी शॄंगार करावा त्याने त्यांची मनस्थिती आनंदी राहते. अर्थात तो किती आणि कधी करावा याचेसुध्दा तारतम्य बाळगले पाहिजे. त्यानंतर सुलेखाला वाय़व्य दिशेच्या खोलीत झोपायला सांगितले. वायव्य दिशेचा अधिपती चंद्र हा स्त्रीतत्वास पोषक आहे. येथील दिक्पाल असलेले पवन देवता देखील इतर सात दिक्पालांपेक्षा सौम्य वृत्त्तीचे आहेत. त्यामुळे अविवाहित मुलींसाठी हि दिशा योग्य मानली जाते. इतकेच काय पण प्राचीन ग्रंथात शॄंगार गृह वायव्य दिशेस सांगितले आह. त्यामुळे ज्या स्त्रियांना छान दिसावे असे वाटते त्यांच्यासाठी हि दिशा काही प्रमाणात उपयोगी आहे. सुलेखाच्या आईवडीलांना नैॠत्य दिशेच्या खोलीत झोपायला सांगितले. सुलेखाला विवाह योग यंत्र देऊन रोज दोन मिनिटे तरी त्याचे पूजन करण्याची पध्दत समजावली.

पुढील वर्षभरात सुलेखाच्या स्वभावात बराच फरक पडला, कुठल्याही मुलाला चटकन नाकारणारी सुलेखा थोडी विचारी होत गेली. वर्षभरात मी तिच्यासाठी १५ -२० मॅचमेकिंग केली आणि शेवटी विवाह योग जूळून आला.

वास्तू – ज्योतिष सल्लागार
आदित्य भागवत

#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

Contact Details

Click to reveal phone number.

वास्तू – ज्योतिष सल्लागार
आदित्य भागवत
Address:
Thane, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!