एकदा एक फोन आला आपण आशिष दादा का …मी …बोलतेय आपली जाहिरात पाहिली फेसबुक ला …आपण व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करता ..मला खूप गरज आहे पैश्याची ..पैसे नाहीत पण कष्ट करायची इच्छा आहे …आमच्या कडे सगळे होते पण अचानक एका प्रसंगाने सगळे बरबाद केले …माझे मिस्टर एका क्लब साठी सल्लागार म्हणून होते …आता तो क्लब बंद झाला …लोकांचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत …लोकांनी आमच्यावर ज्या विश्वासावर गुंतवलेले पैसे आमच्याकडे मागायला लागले ..आम्ही पण कुठून देणार …उलटे अति व्याजापोटी आम्ही पण आमचे आजवर जमवलेली रक्कम त्यात गुंतवली होती …काही दिवसातच सगळे चित्रच बदलले …प्लिज मार्गदर्शन करा ..आज पैसे नाहीत पण मिळाले की आपल्याला नक्कीच त्यातून स्वतःहून पैसे देईन..
प्लिज ताई आपण अश्या हताश होऊ नका ..आपण रहाता कुठे ? आता हल्ली नक्की काय करता ? मग त्यांनी पत्ता दिला …मी 2 दिवसातच त्याच्या घरी गेलो ..एका बैठ्या वस्तीत लहानश्या खोलीत रहात होते …त्याच्या कडे बसायला सोडा साधे प्रॉपर झोपायला पण अशी जागा नव्हती …मी गेल्यावर त्या पटकन बाहेर गेल्या शेजारून एक स्टूल घेऊन आल्या …मी बसणार तोच त्यानी थंडगार ताक पुढे केले …दादा आमच्या कडे फ्रीज नाही थंड पाणी द्यायला ..पाणी पेक्षा ताक प्या मी वाचले आहे तुमच्या #खाद्यभ्रमंती मध्ये आपल्याला ताक फार आवडते …मी नेहमी वाचत असते सगळे ..जेव्हा सगळे नीट होईल मी नक्कीच जाईन तुम्ही लिहिलेल्या मिसळ आणि वडा पाव ठिकाणी …हे येतीलच आता ..तो वर ..असे म्हणत तिने भाकर आणि शेंगदाणा चटणी दिली ..भाकर आणि चटणी ही पण आपल्याला आवडते माहीत आहे दादा…(आपल्या आवडी एवढ्या विचारात घेतले जाते पाहून खुश झालो ) तो विचार करतानाच तिचे मिस्टर आले …येताना त्याच्या हातात एक किटली होती ..तोच ती म्हणाली …हे हल्ली दूध पोहोचवतात ..शेजारील ताई आहे ना ज्यांचे स्टूल आणले त्यांनीच 2 लाईन दिल्यात तेव्हढेच घर खर्चाला मदत ..दादा हे बघ पूर्वी हे एका कंपनीत सुरक्षा रक्षण म्हणून होते कामाला ..ती कंपनी जी मी म्हटली ती झाली बंद ,सुरक्षा रक्षक बरोबर गुंतवणूक सल्लागार म्हणून पण होते ..आता दोन्ही ही नाही कारण त्या कंपनीनं केला घोटाळा ..सगळे सुरळीत होते ते बंद झाले …मी ऐकत होतो सगळे …त्या ताई बोलत होत्या …तायडे दिलेली जी भाकर आणि चटणी दिली होती ती अतिशय उत्तम होती …ती खात असताना आणि ताई बोलत असतानाच माझ्या ताटात अजून एक गरम गरम भाकर त्या ताईने दिले ..मी चकित झालो बोलता किती चटकन त्यांनी भाकर दिली …मी ती खातच म्हटले ..तुम्हाला काय करायचे आहे नक्की ? कशात आवड आहे ? त्याच त्या ताई …आता आवड राहिली बाजूला ..तुम्हाला मी फोन वरच बोलले ..की पैसे नाहीत पण कष्ट करायची आमच्या दोघांची नक्की आहे …लाज नव्हे आता कुठला माज पण राहिला नाही …मी ते एकता एकता हसलो …तोच त्या ताई का हो दादा का हसता अश्या आमच्या परिस्थितीला …आपल्याला आपल्या फी चे पैसे नक्कीच देऊ …मी परत हसलो आणि उठून उभा राहिलो …ताई आपण ग्रेट आहात आपल्या कडे जे आहे ते आजवर आपल्याला कळले नाही …पण मला उमगले ..मी उद्या आपल्याला कळवतो काय करायचे ते ..बस आपल्याला सुरवात उद्या पासून करायची हे नक्की …आणि हो हे दुपारी दुधाला जातात ना …सकाळी नाही ना …म्हणजे तसे प्लान फिक्स करायला ..दादा रागावू नका मी नक्कीच फी देईन ठेवा विश्वास माझ्या वर …तायडे डोन्ट वरी बस उद्या पासून लाग कामाला ..उद्या म्हणजे एकदम उद्या नव्हे पण लवकरच चित्र बदलूया आपले …
* काही दिवस निघून गेले *
त्याच तायडे ने मला एक कोरा करकरीत टिफिन पाठवला ..त्यात काहीच नव्हते …ना तिळगुळ ना गुळाची पोळी …एक चेक होता …दादा तू दिलेला मार्ग मला खूपच उपयोगी पडला… रिकाम्या हाती त्या दिवशी गेला पण पोट तृप्त होऊन मी पाठवले होते …आज मी तुझ्या मुळे तृप्त नव्हे संतुष्ट आहे …म्हणून रिकामे टिफिन पण खाली हाताने नव्हे तर फुल ना फुलांची पाकळी म्हणून पाठवत आहे …हाच डबा घेऊन तू माझ्या “टिफिन सेवा” केंद्रात यायचे आहे …माझ्यातील हाताची चव तू लोकांच्या समोर आणलीस …ऑर्डर आधी घेऊन त्यांचे पैसे आगाऊ घेऊन मला शून्यातून व्यवसाय उभा करून दिलास …ह्यांच्या साठी थंडगार “ताक “केंद्र उघडून दिलेस …बस तुझे मार्गदर्शन खरच आम्हाला उभे राहायला उपयोगी झाले ..
गोड शब्द आणि चांगले विचार खूप काही देऊन जातात तुझे हे शिकवणे आज माझा व्यवसाय उभारीला उपयोगी पडला ..नक्की ये !!
#मी_लाभार्थी_तुझ्या_मार्गदर्शनाची
जेव्हा असा अनुभव येतो खूप बरे वाटते …त्या तायडे च्या हाताला चव होती ..चटकन जर भाकऱ्या बनवू शकते …काहीही खास वस्तू घरात नसताना शेंगदाणा चटणी कुटून देणें ..हेच मी हेरले तिला खास मेन्यू सेट करून मार्केटिंग सुरू केले ..आयडिया व्यवसाय उभारू शकते …खाद्य व्यवसाय असा आहे आधी पैसा मग सर्विस अश्या पद्धतीने करू शकतो …पण योग्य प्लानिग , मार्केटिंग आणि बेस्ट सर्विस असणे गरजेचे आहे..
#आशिष_फाटक
सोशल मीडिया marketing / content writing
बिझनेस वाढवण्यासाठी तंत्र अँड मंत्र ..
(वरील पोस्ट कथा नव्हे तर वास्तवात घडलेली आहे , माझ्या प्रोफेशन मध्ये जे परवानगी देतात त्याचेच नाव मी जाहीर करतो , ह्या ताईने नाव जाहीर करायला सांगितले नाही त्यामुळे फक्त अनुभव शेयर करीत आहे )
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
#bonding_से_branding_तक
Click to reveal phone number.
Ashish Phatak – Online Media Partner
Address: Pune, Maharashtra.
Submit your review | |
1 2 3 4 5 | |
Submit Cancel |