मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात?

मेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय ?

अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे २४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी इन्शुरन्स कंपनी कडून दावा / क्लेम घेण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत दाखल करून झालेला सर्व खर्च परत मिळवता येतो.

मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात?

१) खोलीभाडे(Room Rent)
२) नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)
३) डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)
४) डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)
५) आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)
६) गोळ्या, औषधे , सलाईन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)
७) सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)
८) एम आर आय खर्च (MRI CHARGES)
९) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन),
१०) रक्त-लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test),
११) प्लेटलेस (Platless) पिशवी
१२) रक्त पिशवी खर्च (Blood)
१३) विशेष लॅबोरेटरी तपासण्यांचा खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)
१४) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)
१५) ऑपरेशन थिएटरचे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)
१६) डॉक्टर सर्जरी खर्च ( DOCTOR Surgery Charges)
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?

१) अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.

२) बँकेत बचत अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.

३) बँकेत ठेवलेली FD (एफ. डी.) मोडावी लागते.

४) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.

५) नातेवाईक मित्र मंडळी यांच्याकडे हात पसरावे लागतात. किंवा सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते.

६) वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मेडिक्लेम असल्यास

१) आपली निश्चिन्तमनाने मानसिक आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.

२) हॉस्पिटलमध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही.

३) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.

४) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

मेडिक्लेमची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही आणि मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
गितांजली तनपुरे

Contact Details

Click to reveal phone number.

Gitanjali Tanpure – Mediclaim Consultant 
Address:
  Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews
error: Content is protected !!