व्यवसाय वाढवायचा असेल तर फेसबुक बिझनेस पेज असणे गरजेचे आहे ..!!

आज थोडक्यात फेसबुक बिझनेस पेज तुम्हाला तुमच्या बिझनेस वाढीसाठी किती उपयोगी ह्याबद्दल सांगणार आहे, अगदी थोडक्यात असल्याने कारण फेसबुक बिझनेस पेज हा विषय खूप मोठा आहे , आणि त्यांचे फायदे पण अनेक आहेत सध्या फेसबुक बिझनेस पेज बनवायला फेसबुक, मेटा काहीच चार्ज करीत नाही पण त्यावर योग्य माहिती लिहिणे , लोकांना म्हणजे संभाव्य ग्राहकांना कायम आकर्षित करायला त्यावर जी ॲक्टिव्हिटी करावी लागते त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला जो तुमचे पेज सांभाळत आहे त्याला फी (मानधन).द्यावे लागते ..

थोडक्यात माहिती फेसबुक बिझनेस पेजची
फेसबुक बिझनेस पेज बनवा आणि आपला बिझनेस कायम ऑनलाईन दाखवा …

हल्ली आपल्याला फ्रेंड रिक्वेस्टची कमी अन् फेसबुक पेज लाईक करण्याबाबतची जास्त नोटिफिकेशन येत असतील नाही का? उठ की सुट ओळखी-अनोळखी कुणीही येतं अन् आमच्या पेजला लाईक करा असं सांगून जातं, तेंव्हा आम्ही का करू तुमच्या पेजला लाईक असा एखादा विचारही आपल्या मनात त्या नोटिफिकेशन सारखा डोकावून जात असेलंच.

फेसबुक प्रोफाइल, फेसबुक पेज याबाबत आपल्याही मनात काही शंका, काही प्रश्न नक्कीच असतील. त्यामुळेच आज जाणून घेऊयात फेसबुक पेज कोण, कधी, का, कशासाठी वापरतं आणि त्यांचा आपल्याला फायदा किंवा उपयोग कसा होतो.

👉 फेसबुक पेज हे फक्त व्यवसायासाठी वापरतात हा भ्रम आहे.

👉 फेसबुक पेजच्या माध्यमातून कम्युनिटी बिल्ड करणं, त्यांच्या संपर्कात राहणं, विविध पोस्टच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणं तसेच कनेक्ट झालेल्या ऑडियन्सशी इमोशनली, प्रोफेशनली रिलेशन बिल्ड करणं हे पेज वापरणाऱ्यांचे हेतू असतात.

👉 असं कोणतं क्षेत्र नाही, ज्यासाठी फेसबुक पेज उपयोगी पडत माहिती. सरकारी, खाजगी तसेच वैयक्तिक पातळीवर अनेक लोकांशी कनेक्ट होण्यासाठी फेसबुक पेज नक्कीच मदत करते.

👉 व्यवसायिक फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची, सेवा/उत्पादनांची माहिती टार्गेट ऑडियन्सला सांगू शकतो तसेच फेसबुक पेड कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांची मार्केटिंग करू शकतो.

👉 एखादी व्यक्ती आपले छंद जोपासण्यासाठी व त्यांना इतरांशी शेअर करण्यासाठी देखील फेसबुक पेजचा आधार घेऊ शकते. विषय, कंटेंट, सादरीकरण यांचा विचार करून इतर लोकं अशा पेजशी कनेक्ट होतात, त्यांना फॉलो करतात.

👉 ब्लॉग/वेबसाईटवर ट्राफिक वाढवण्यासाठी देखील फेसबुक पेजचा वापर केला जातो. न्यूज पोर्टल्स याचं उत्तम उदाहरण.

👉 व्यावसायिक आपल्या सेवा/उत्पादनांची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून पेजशी कनेक्ट झालेल्या ऑडियन्सशी एंगेज राहतात. कनेक्ट झालेली लोकं पेजशी एंगेज राहावीत यासाठी व्यावसायिकांना ‘मनोरंजन आणि माहिती’ यांची सांगड घालून आपल्या कंटेंटची निर्मिती करावी लागते.

👉 पर्सनल ब्रँडिंगसाठी सेलिब्रिटी, नेतेमंडळी, वैयक्तीक पातळीवर काम करणारे लोकं जसे फिटनेस, योगा ट्रेनर तसेच साहित्य, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी देखील फेसबुक पेजचा वापर लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी करतात.

👉 फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण पर्सनल प्रोफाइलपेक्षा अधिक लोकांच्या संपर्कात राहू शकतो. प्रोफाइलवर आपण ठरवतो कोणाला आपल्या मैत्र यादीत जागा द्यायची आणि कोणाला नाही, त्याच्या उलट पाहण्यात आलेल्या किंवा लाईक करण्यासाठी इन्व्हाईट केलेल्या पेजला लाईक, फॉलो करायचं की नाही हे लोकं ठरवतात.

👉 मनोरंजन, माहिती देणाऱ्या फेसबुक पेजेसला लोकं आपापल्या आवडीनुसार लाईक करतात, फॉलो करतात. ज्या पेजशी ते जास्त एंगेज राहतात, त्याच पेजचे अपडेट्स त्यांना त्यांच्या फेसबुक वॉलवर दिसतात.

👉 आवडते ब्रँडच्या, आवडत्या सेलिब्रिटीच्या तसेच मनोरंजन करणाऱ्या व माहिती देणाऱ्या फेसबुक पेजेसला लोकं स्वतःहून लाईक करतात, त्या पेजशी जास्त एंगेज राहतात.

👉 फेसबुक पेज वापणाऱ्या व्यक्ती, व्यवसाय, संस्था यांना देखील आपल्या पेजवरील सातत्य राखून कनेक्ट झालेल्या आणि होणाऱ्या लोकांचा विचार करून कंटेंट शेरिंगबाबतची स्ट्रॅटेजी आखावी लागते जेणेकरून पेजची एंगेजमेंट वाढती राहील.

👉 फेसबुक पेजवर कंटेंट शेरिंगबाबत तसेच शेअर केलेल्या पोस्टबाबत अधिक टेक्निकल फीचर्स उपलब्ध असतात. पोस्ट शेड्युल करणं, पोस्ट बॅक डेटला शेअर करणं, पेज हाताळण्यासाठी इतरांना राईट्स देणं हे पर्याय असतात. पेजवरील कोणती पोस्ट किती लोकांपर्यंत पोहचली, त्याची एंगेजमेंट किती, आपल्या पेजला कोणत्या ठिकाणाहुन किती, कोणत्या वयोगटाची व कोणत्या लिंगाची लोकं कनेक्ट झालेत यासारख्या गोष्टी जाणून घेता येऊ शकतात.

👉 ज्याप्रमाणे आपण नको त्या व्यक्तीला प्रोफाइलवर ब्लॉक करू शकतो, त्याचप्रमाणे पेजवर देखील आपण एखाद्या प्रोफाइलला ब्लॉक करू शकतो.

👉 फेसबुक पेड कॅम्पेनच्या माध्यमातून आपण ठरवू त्या लोकांपर्यंत आपण आपली पोस्ट, पेज, माहिती तसेच व्यवसायिकदृष्ट्या कामाच्या असणाऱ्या गोष्टी पोहचवू शकतो.

👉 फेसबुकपेजच्या माध्यमातून सेवा/उत्पादनांची विक्री करणं देखील शक्य आहे. त्यासाठी आपण आपल्या सेवा/उत्पादनांची लिस्टिंग पेजवर शॉप या ऑप्शनद्वारे करू शकतो. त्यांची तिथे महिती देऊ शकतो.

👉 पर्सनल प्रोफाइल कोणी एकजण वापरतो, तर फेसबुक पेज एकापेक्षा जास्तजण वापरू शकतात. पेज हँडल करण्यासाठी वेगवेगळे “पेज रोल्स्” आपण ओळखीच्यांना देऊ शकतो. (व्यवसायिक हेतूसाठी याचा जस्ट वापर होतो)

याप्रमाणे फेसबुक पेजची अनेक वैशिष्ट्ये आहेत. वेगवेगळ्या हेतूसाठी या पेजचा वापर केला जातो. मुळात लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी याचा उपयोग होतो.

त्यामुळे इथून पुढे फेसबुक पेज लाईक करण्याबाबत नोटिफिकेशन आले तर सर्वात आधी त्या पेजचा आपल्याला नक्की काय फायदा, काय उपयोग होऊ शकतो हे पाहूनच त्याला लाईक आणि फॉलो करायचे की नाही हे आपण ठरवायचे.

आशिष अनिल फाटक

सोशल मीडिया पार्टनर आशिष फाटक
#FacebookPage
#FacebookBusinessPage
#YourKnowledgePartner
#branding_से_bonding_तक
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

Contact Details

Click to reveal phone number.

आशिष अनिल फाटक
Address:
Kalyan – Pune – Thane,  Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!