ग्रेट भेट उद्योजकांची - शनिवार,०८ जून २०२४,
ग्रेट भेट उद्योजकांची – शनिवार,०८ जून २०२४,
Health Family Fitness & Breakfast Studio,
सदाशिव पेठ, खजिना विहीरीसमोर, पुणे*
आशिष फाटक व गृप ॲडमिन्स यांनी ३० मे २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार त्याच दिवशी महिला सशक्तीकरणासाठी महिलांसाठी *ग्रेट भेट उद्योजकांची -महिला उद्योजिका विशेष* हा WhatsApp गृप सुरू केलातेव्हापासून आजपर्यंत ह्या गृपला २७० महिला भगिनी जोडल्या गेल्या
आशिष फाटक यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पहिली मिटींग शनिवार ०८ जून २०२४ रोजी आयोजित केली गेली महिलांना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी आशिष फाटकांबरोबरच ॲडमिन गृपमधील पुरुष पण उपस्थित होते
मिटींग सकाळी ९३० वाजता सुरू झाली सुरवातीला आशिष फाटक यांनी उपस्थितांचे स्वागत केले मग उद्योजिकांना त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायला सांगितले व नंतर आपल्या गृपचा इतिहास व ध्येयधोरणे उपस्थितांना विषद केली
प्रत्येक उद्योजिकांनी आपल्या गृपची आप आपला व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी निवड का केली हे सांगितले आपल्या गृप मधे नव नवीन संकल्पना सादर करून प्रत्येक सदस्यांना एकत्र आणले जाते हे जास्त करून सर्व उद्योजिकांना जाणवले असे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून जाणवले
आशिष फाटक यांनी उपस्थितांना आप आपल्या दैनंदिन व्यक्तीगत आयुष्यात सकाळी जाग आल्यावर वापरत असलेल्या १० वस्तूंबद्दल माहिती सांगितली त्याबरोबरच त्यातील एका प्रॉडक्टस बद्दल सविस्तर माहिती सांगायला सांगितली बहुतेकांनी एका विशिष्ट वस्तूची माहिती सांगताना त्याचे गुणधर्म, उपयुक्तता सांगितली म्हणजे थोडक्यात त्या प्रॉडक्टसची नकळत जाहिरात केली इथेच आशिष फाटक यांनी महिलांच्या पहिल्या मिटींगमध्ये उपस्थितांना गुगली बाॅल टाकला असे मी म्हणतोय कारण आशिष फाटक यांना अपेक्षित होते कि प्रत्येक उद्योजिका स्वत:च्या प्रॉडक्टसची गुणधर्म, USP व उपयुक्तता सांगतील, पण उपस्थित उद्योजिकांपैकी फक्त २ उद्योजिकांनी स्व:ताच्या प्रॉडक्टसचे प्रमोशन केले
ह्या मिटींगमध्ये अजून एक टास्क देण्यात आला होता
प्रत्येक उपस्थितांनी आप आपल्या व्यवसायातील अश्या घटना सांगायच्या कि ज्यामुळे त्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले
नंतर आशिष फाटक यांनी उपस्थितांना आप आपल्या व्यवसायाच्या Support System बद्दल माहिती सांगायच्या सूचना दिल्या
आशिष फाटक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व नंतर उपस्थितांचा गृप फोटो काढून मिटींग संपन्न झाली
नंतर ओपन सेशनमध्ये उपस्थितांनी संतोष पळसुलेदेसाई यांनी पुरवलेल्या अल्पोपहाराचा व चहाचा आस्वाद घेत अनौपचारिक चर्चा करत Business Cards शेअर केली
अशा रितीने आपल्या गृपमधील महिलांची पहिली मिटींग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
ऍडमिन टीम – ग्रेटभेट उद्योजकांची
Click to reveal phone number.
Great Bhet Meeting
Address: Pune, Maharashtra.