सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो, सप्रेम नमस्कार रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
1) जागतिक महिला दिन. रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ परिवारातील महिला सभासदांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिन साजरा करण्याचे योजिले आहे.या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाचा मानस आहे.
2) मोफत नेत्र तपासणी शिबिर . रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ नांदेड सिटी व देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.शिबिरार्थिंना आवश्यकतेनुसार चष्मा सवलतीच्या दरात बनवून देण्यात येणार असून, मोतीबिंदू व इतर ऑपरेशन वर सुद्धा सवलत देण्यात येणार आहे.
तरी नांदेड सिटी व परिसरातील ज्येष्ठांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण.
कार्यक्रम स्थळ: सारंग सोसायटी क्लब हाऊस , नांदेड सिटी पुणे. वार: रविवार . दिनांक: 10/03/2024 . वेळ: सायंकाळी 3 ते 8.
आपला स्नेहांकित
(शिवाजी खेसे ), सचिव, रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ नांदेड सिटी पुणे.
Contact Details
Click to reveal phone number.
रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ नांदेड सिटी पुणे. Lalit, Nanded City,Pune – 41 Maharashtra.