सरदार वल्लभभाई पटेल - स्टॅच्यू ऑफ युनिटी टूर
भारतातील पहिले उपपंतप्रधान भारत रत्न तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी समर्पित आहे. ही जगातील सर्वात उंच मूर्ति आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना “भारताचा आयर्न मॅन” म्हणूनही ओळखले जाते. ते स्वातंत्र्यसेनानी, वरिष्ठ नेते आणि भारतीय गणराज्य संस्थापक संस्थापकांपैकी एक होते. भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा नदी वर असलेल्या साधू बेटावर हे स्मारक आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं 31 ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. जगातील सर्वात मोठा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला. तब्बल 182 मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही तितकाच भव्य दिव्य करण्यात आला.
स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी सुमारे 1 लाख 69 हजार गावातील शेतकऱ्यांनी 135 मेट्रिक टन लोखंड दान केले आहे. त्याचा वापर करुन भव्य पुतळा उभारण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर इतकी आहे.
1999मध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी या प्रतिमेचे डिझाईन तयार केले आहे. त्यांनी 50हून अधिक स्मारकांची निर्मिती केली आहे. राम सुतार हे मूळचे महाराष्ट्रातील धुळ्याचे आहेत.
चीनमधील स्प्रिंग टेंपल येथील बुद्धाची प्रतिमा तयार करण्यासाठी तब्बल 11 वर्ष लागली होती. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी केवळ 33 महिन्यांचा कालावधी लागला आहे.
6.5 रेक्टर स्केलचा भूकंपातही स्टॅच्यू ऑफ युनिटी न डगमगता उभी राहू शकते. ताशी 180 किलोमीटरपर्यंत वाऱ्यांचा वेग झेलू शकते.
नर्मदा नदीपासून 3.5 किलोमीटर दूर असलेल्या सरदार सरोवरावर स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आलं आहे.
पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 153 मीटर उंचीपर्यंत जाता येणार आहे. तर, स्टॅच्यू ऑफ युनिटी 12 किमी लांबीवरुन नजरेस पडते.
आवडली ना ही माहिती …
आता वाटते ना ..
अशी जागा स्वतः डोळ्याने जाऊन पहावी ..
मग कसला करताय विचार ..
आम्ही आहोत ना !!
विमान प्रवास झाला थोडा का होईना स्वस्त त्याचा घ्या फायदा …
अजूनही फिरायला जाण्याचा प्लॅन केला नसेल तर आजच प्लॅन करा ..
For Best Service Call : Travel & Leisure
Click to reveal phone number.
Travel & Leisure
Address: Plot No 5, Jagdish Soc. Dhankawadi, Pune – 43 Maharashtra.