भूतकाळातील त्रासदायक गोष्टी विसरायच्या आहेत?

आपण करूयात ऐक छोटासा प्रयत्न.

ब्रेकप नंतर/ घटस्फोटानंतर आपल्या पार्टनरला विसरण्याचा प्रयत्न करतात किंवा घरामधील सासू , ननंद, दीर ,जाऊ यांच्यामधील वाद किंवा ऑफिसमधील बॉस , क्लाइंट यांच्यामधील वाद विसरण्याचा प्रयत्न करतात.
परंतु जी गोष्ट विसरायची आहे त्याबद्दलच ते कंटिन्यू विचार करीत असतात किंवा इतरांसोबत त्यांच्याविषयी सतत काही ना काही बोलत असतात आणि या सर्व गोष्टी नकळत मेंदूमध्ये फीड होत जातात . आपल्याला जर ती गोष्ट खरच मनापासून विसरायची आहे तर ,विचार करतानाही आपण काय विचार करतोय याकडे लक्ष असणे जरुरी आहे.
लहानपणी म्हणायचे, “विचार करून बोलले पाहिजे” परंतु मी म्हणते की विचार करून विचार केला पाहिजे”
होय थोडसं लक्ष देऊन वाचा मला काय म्हणायचं आहे ते .दिवस भर जी आपण बडबड करीत असतो ती सारखी रिपीट होते ,
(जसे सायकल शिकताना पहिल्यांदा आपल्याला लक्ष द्यावे लागते आणि सारखी (रिपीट) practice करावी लागते दहा पंधरा दिवसानंतर ती आपल्याला आपले लक्ष दुसरीकडे असताना ही सहजपणे येते कारण आता सायकल शिकणे आपल्या ब्रेनमध्ये फीड झाले आहे .)बिलकुल तसेच,
आपण केलेली बडबड आपण विसरण्याचा प्रयत्न केला तरी/आपले लक्ष दुसरीकडे असले तरी ती गोष्ट पुन्हा पुन्हा आठवत असते, कारण आता ती आपल्या ब्रेन मध्ये फीड झालेली असते .म्हणून कोणत्याही गोष्टीचा विचार करताना आपण काय विचार करत आहोत आपल्या मनात कोणती बडबड सुरू आहे त्याकडे आपण लक्षपूर्वक पाहण्याची गरज आहे.
आपण आपल्या मेंदुला ऑर्डर द्यायला शिकायला हवं, जेव्हाही व्यर्थ विचार सुरू होतात तेव्हा आपण ऑर्डर द्यायची स्टॉप आणि नंतर जे काय आठवते त्याला ऑर्डर द्यायची की कट आणि डिलीट.
मी एक मेमोरी डिलीट करण्याची सिम्पल टेक्निक तुम्हाला करण्यासाठी सांगते, तुम्ही शांत बसून ती करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
( ज्या व्यक्तींना अतिशय जास्त मानसिक त्रास होत आहे त्यांनी तज्ञांची मदत घ्यावी प्लीज)
आपल्या मेंदूला पिक्चरांची भाषा समजते , तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होत आहे तो पिक्चर किंवा सीन तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा, आणि कल्पना करा त्या पिक्चरला पूर्ण व्हाईट कलरचा paint (colour )देत आहोत,किंवा त्या पिक्चर ला एक डस्टर घेऊन रफ करीत आहोत.असे तो पर्यंत करीत रहा जोपर्यंत तो पिक्चर पूर्णपणे दिसेनासा होईल. कल्पना करा ,आणि पहा चमत्कारी बदल तुमच्या त्रासदायक आठवणी विसरण्यात होईल.
आणि जे विसरायचे आहे त्याच्या बद्दल बोलायचे किंवा शेअर करायचे सोडून देणे गरजेचे आहे, लक्षपूर्वक जाणीव ठेवून इतर विषयी गप्पा मारा किंवा चांगले वाचन करा, चांगले ऐका,चांगले पहा,चांगले विचार करा. ब्रेन ची चांगली प्रोग्रामिंग करा.

” जैसा सोचोगे तुम वैसे बन जाओगे”

Rajashri Mind & Wellness Center

Contact Details

Click to reveal phone number.

Rajashri Mind & Wellness
Address:
Kamal appartment,
ground floor, Near madhumira function hall,
kokate nagar Latur, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!