मी लातूर येथे राहते.मी माझ्या घरूनच माझा छोटासा फूड बिजनेस वेलाज् फूड्स या नावाने करते.कोरोना काळ फार वाईट आणी कटू होते .रुग्णांना जेवण तर लांब पण साधं बिस्किटे पण भेटत नव्हती .तेव्हा मला अस वाटले की आपण काही तरी करू मग टिफिन चालू केले .एका टिफिन पासून सुरुवात केली. आणी बघता बघता घरी असलेले रुग्ण, हॉस्पिटल मधील, ICU चे अशा अनेक घराघरात माझे टिफिन पोचत होते. मी पहाटे चार वाजता किचन चालू करायची व सकाळी नऊ वाजता सर्व पैकींग करून पाठवायची या कामात एक डिलिव्हरी मुलगा ठेवला होता. आणी लाला ग्रुप मध्ये माझा लाईव्ह शो झाला .नन्तर फराळ ऑर्डर भरपूर येत गेले .दिवाळी गौरी गणपती च्या शिवाय छोटे खानी घरगुती कार्यक्रम चे जेवणाची ऑर्डर येतात.हिवाळ्यात मेथी लाडू,उडीद मुंग लाडू,ड्राय फ्रुट लाडू,जवस लाडू,शुगर फ्री लाडू असे चालतात.मला मागील वर्षी आमच्या लाला ग्रुप मधून सक्सेस बिझनेस woman म्हणून प्रशस्ती पत्र व एवार्ड पण भेटल आहे.आता पर्यंत माझे पदार्थ ,फराळ अनेक ठिकाणी पोचले आहे. बिदर,जळगाव, सोलापूर,निलंगा,दुबई, उस्मानाबाद,आणी लातूर मध्ये घराघरात ,अनेक मान्यवर dr भगिनीं याची ऑर्डर असतात.या वयात माझी ओळख झाली आहे .माझी पुरणपोळी थाळी ,ग्रामीण थाळी ,शेंगा पोळी, खवा पोळी,खजूर पोळी वगैरे आवडीने घेतात .असो असा माझा प्रवास आहे मागील तीन वर्षा पासून आता पर्यंतचा….
Contact Details
Click to reveal phone number.
Vela’s Foods Address: “Tathastu”, Near Kandoba Temple, Tirupati nagar, Sai Road, Latur. Maharashtra.