स्नान करण्यापूर्वी करावयाचे प्राणायाम

एखाद्या चांगल्या योगवर्गात प्राणायामाचे खालील मूलभूत प्रकार शिकता येतात.

1) भस्रिका किंवा श्वासाचा जोरजोरात आवाज करणे हा जाणीवपूर्वक सातत्यपूर्णतेने श्वास घेण्याचा प्रकार आहे. ‘कुंभ’ असे ज्याला म्हटले जाते त्या श्वास रोखण्याच्या क्रियेत त्याची अखेर होते. त्या पाठोपाठ जाणीवपूर्वक सातत्यपूर्ण उच्छ्वास करून तोही कुंभाने संपवला जातो. भस्रिकेमुळे फुफ्फुसांमध्ये धरून ठेवण्यात आलेले हवेचे प्रमाण कमाल मर्यादेपर्यंत जाते आणि ती बाहेर टाकण्याचाही कमाल वेग निर्माण होतो. यामध्ये श्वासपटलाच्या आणि फुफ्फुसांभोवतीच्या अनेकविध कोशांचा व्यायाम होतो.

2) ‘कपालभाती’ याचा शब्दश: अर्थ कपाळ (कपाल) चमकणे किंवा प्रकाशमान (भाती) होणे असा आहे. कपालभातीमध्ये जलद गतीने केलेल्या श्वासोच्छ्वासानंतर कपाळावर घामाचे छोटे थेंब जमा होण्यावर भर दिला जातो. नाडी शोधन याचा अर्थ नाड्या (मार्ग) स्वच्छ करणे आणि त्याचा संदर्भ नाकातील मार्गांशी आहे.

3) अनुलोम-विलोम मधून एका नाकपुडीतून श्वास किंवा हवेचा प्रवाह आत घेणे आणि दुसरीतून बाहेर सोडणे हा प्रकार केला जातो. यात एका पाठोपाठ एक अशा प्रकारे श्वास आत घेणाऱ्या नाकपुडीच्या दुसऱ्या बाजूची नाकपुडी बोटाने बंद केली जाते.

4) ‘उज्जया’ मध्ये गळ्यातील स्वरतंतू ‘बंध’ मध्ये आवळले जातात आणि त्यांमधून हवेला जाऊ देणे भाग पाडले जाते. त्यामुळे स्नायूंना आणि स्वरयंत्र असलेल्या घशातील पोकळीला बळकटी प्राप्त होते.

5);’शीतली’ आणि ‘सित्कारी’ प्राणायाम हे श्वास थंड बनवणारे प्राणायाम आहेत. या प्राणायामांमध्ये तोंडाच्या मागच्या बाजूला पिच्युटरी ग्रंथीच्या बरोबर खाली टाळूजवळ हवा आत खेचली जाते.

6) ‘भ्रामरी’ हा मधमाशीच्या गुणगुणण्यासारखा आवाज करणारा प्राणायाम आहे. यामध्ये नाकाव्यतिरिक्त डोक्याची सर्व प्रवेशद्वारे बंद करून श्वसनावर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे कवटीमध्ये आवाज घुमतो आणि त्याद्वारे श्लेष्मल आणि श्लेष्मा किंवा कफ सुटतो.

थोडक्यात नियमितपणे सराव केल्यास प्राणायामामुळे रक्ताभिसरणात आणि दम, कार्यशक्ती टिकून राहण्यात सुधारणा होते.

– शुभांगी जैन
दीप योग & फिटनेस सेंटर
पुणे & लातूर

दीप योग इन्स्टिट्यूट कडून खालील क्लास घेतले जातात.
1. फॅटलॉस योगसाधना वर्ग
2. PCOD नियंत्रण योगवर्ग
3. Infertility नियंत्रण योगवर्ग
4. 108 सूर्यनमस्कार वर्ग.
5. नित्य सूर्यनमस्कार वर्ग.
6. योगिक निद्रा वर्ग
7.मेडीटेशन
8. Daily योग आसान वर्ग
धन्यवाद🙏

Deep Yoga Center Nanded City, Pune

Contact Details

Click to reveal phone number.

Deep Yoga Center
Address:
  Nanded City, Pune & Latur, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 1 reviews
 by Sushila
Best Yoga Instructor

Tried 2-3 yoga institutions but Deep yoga center is the best classes & Shubhangi maam teaches you very well. It really helped me to maintain my body strength.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!