

चवीपुरतं असणाऱ्या लोणच्याला व्यापक स्वरूप देऊन स्वतःच अस्तित्व निर्माण करणारी , अस्सल महाराष्ट्राचा स्वाद म्हणून ओळख देणारी सुगरण म्हणजेच सौ. प्रीतम जाधव
——————————————-
उद्योग क्षेत्रामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येत असलेली प्रीतम जाधव या वासनगाव ता.जि.लातूर ,खरंतर यशस्वी उद्योजक म्हणून हे असं आगळंवेगळं नाव ऐकायला आपल्या कानाला सवय नसते आणि त्यातही ती महिला असेल तर नाहीच नाही. परंतु हे एका सामान्य गृहिणीने जिद्द ,चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर सिद्ध करून दाखवले आहे. होय ती हीच यशस्वी उद्योजिका, समर्थ फूडसची संचालिका आणि सुगरणीचे लोणचे या ब्रँडची निर्माती प्रितम जाधव. शून्यातून विश्व निर्माण केलेली अनेक माणसे आपल्या आयुष्यात येतात. आपल्याला त्यांच्याबद्दल कुतूहलही वाटतं परंतु शुन्याच्या अगोदर अंक तयार करण्यासाठी त्यांनी केलेले अपार कष्ट मात्र आपण तितकेसे पारखून बघत नाहीत. सौ प्रीतम जाधव यांनी हा उद्योग निर्धाराने सुरू केलेला होता. कारण त्यांनी आखलेल्या प्रत्येक गोष्टी मध्ये सखोलता होती. लज्जतदार ,चटकदार हे शब्द केवळ जाहिराती पुरते मर्यादित न ठेवता त्या लोणच्यामध्ये त्यांनी मुरवलेले होते. कॉन्टिटी कितीही झाली तरीही कॉलिटी मध्ये कसलाच फरक पडणार नाही याची त्या सतत काळजी घेत राहिल्या . त्यामुळेच आज हा उद्योग समूह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले हातपाय पसरतोय. एकही घर असं नसेल की ज्या घरांमध्ये लोणच वापरले जात नाही . जनसामान्यांची , चवीने खाणाऱ्यांचे लोणचं ही गरज आहे. आणि ही गरज ओळखूनच या सुगरणीने आपल्या हाताची जादू प्रत्येक घरा घरापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचललेला आहे. प्रीतम जाधव आज फक्त ग्रहीणी राहिलेली नाही पण एक यशस्वी उद्योजिका म्हणून काम करत असतानाही गृहिणीचे बारकावे मात्र आजही त्यांच्या चवीमध्ये जाणवतात. आपण म्हणतो ना की लोणचं जितकं जास्त मुरेल तितकी त्याची चव अधिक खुलते अगदी तसाच प्रकार प्रीतम जाधव यांच्या बाबतीत झालेला आहे. त्या जशा जशा उद्योग क्षेत्रांमध्ये मुरत गेल्या तसा तसा सुगरणीचे लोणचे हा ब्रँड खुलत गेला . परखड आणि स्पष्ट स्वभावाच्या प्रितम अशा उद्योग व्यवसायामध्ये कशा काय टिकतील असा अनेकांना सुरुवातीला प्रश्न नक्कीच पडला असेल परंतु हीच तर खरी सौ . प्रीतम यांची खासियत ठरली. काळानुसार स्वतःमध्ये बदल करून घेऊन त्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. आमची शाखा कुठेही नाही असं सुरुवातीला सांगणाऱ्या प्रीतम यांच्या पाठीमागे आज संपूर्ण महाराष्ट्रातुन आम्हाला सुगरणीचे लोणचे या ब्रॅंडची शाखा हवीये म्हणून मागणी होतेय यातच त्यांचं खरं यश दिसून येत. आपण नेहमी घरामध्ये वापरतो ते फार झालं आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं ,मिरचीचं लोणचं परंतु सौ प्रीतम जाधव यांनी समर्थ फुडस च्या माध्यमातून एकूण 56 प्रकारची लोणची बाजारात उतरवुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला . अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या चटकदार ,लज्जतदार ,आरोग्याला लाभदायक ठरतील अशा लोणच्यांची निर्मिती केली.. ऐकायला थोडं मजेशीर वाटतं पण हे वास्तव आहे प्रत्येक लोणच्याची चव ग्राहकांच्या जिभेवर कायम तरंगत असते. अशा या समर्थ फुडस च्या संचालिका आणि सुगरणीचे लोणचे या ब्रँडच्या निर्मात्या सौ प्रीतम जाधव यांना यशस्वी उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
आम्ही खाली दिलेले लोणच्याची उत्पादक आहोत.
1 ओल्या हळदीचे लोणचं
2 कैरी चे तिखट लोणचे
3 कैरी लोणचं
4 लिंबू तिखट लोणचं
5 लिंबू तिखट लोणचं (oilfree)
6 अद्रक लोणचं
7 लसूण लोणचं
8 मशरूम लोणचं
9 कारल्याचे लोणचे
10 गाजराचे लोणचे
11 खजूर लोणचं
12 आवळ्याचे लोणचे
13 मिक्स लोणचं
14मिक्स व्हेज लोणचं
15 लिंबू क्रश
16 लिंबू चटणी
17 उपवासाचे लिंबू लोणचे
18 टोमॅटो लोणचं
19 Mix dry fruit with honey
20 कोरफड लोणचं
21 शेवगा लोणचं
22 गोबी लोणचं
23 आंबोशी लोणचं
24 बिजोरा आचार
25 चुंदा
26 तक्कु
27 मिरची तुकडा
28 फेसलेली मिरची
29 कलोणजी लोणचं
30 लाल मिरची लोणचं
31 हिरवी मिरची लोणचं
32 चिंच लोणचं
33 मटण लोणचं
34 कोल्हापुरी मटण लोणचं
35 चिकन लोणचं
36 प्रॉन्स लोणचं
37 मेथांबा लोणचं
38 वांग्याचे लोणचं
39 अद्रक व ओल्या हळदीचे लोणचं
40 केर सांगरी लोणचं
41 कैरीचे गुजराती लोणचं
42 कैरी कांदा लोणचं
43 करवंद लोणचं
44 भोकर लोणचं
45 बिन तेलाचे कोरडे लोणचं
46 मोड मेथी लोणचं
47 काकडी लोणचं
48 बाळकैरीचे लोणचं
49 बिन्स चे लोणचं
50 कांद्याचे लोणचं
51 लाल मिरची ठेचा
52 काबोली चना लोणचं
53 माईनमुला लोणचं
54आंबटकयी लोणचं
55 सर्व फळांचे लोणचे
56 सर्व प्रकारच्या भाज्यांचे लोणचं

Click to reveal phone number.
Sugraniche Lonche – Preetam Jadhav
Address: Main Ausa Road, Opp. Datta Mandir, Near Baramade Hospital, Latur – 413512
Maharashtra, India.
Like, Share & Subscribe
Submit your review | |
1 2 3 4 5 | |
Submit Cancel |
Sugraniche lonche products are really good & I have seen first time in my life, 56 types of pickles. Taste is awesome.