

संवादकर्ता: @सोशल मिडिया पार्टनर आशिष फाटक
उद्योजक: विद्या गोगटे आणि अवधूत गायतोंडे – Swadart
—
आशिष फाटक: तुमचं पूर्ण नाव काय आहे?
विद्या आणि अवधूत: आम्ही विद्या गोगटे आणि अवधूत गायतोंडे.
आशिष फाटक: तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे?
विद्या आणि अवधूत: आमच्या व्यवसायाचं नाव आहे Swadart Foods
आशिष फाटक: व्यवसायाचं ठिकाण आणि पत्ता काय आहे?
विद्या आणि अवधूत: आमचं ठिकाण आहे – गोगटे वाडी, गोरेगाव पूर्व (सन्मित्र मंडळ शाळेसमोर), मुंबई 63.
आशिष फाटक: सोशल मीडियावर कुठे आहात तुम्ही?
विद्या आणि अवधूत: आमचं इंस्टाग्राम लिंक आहे – swadart.store
—व्यवसायाची ओळख
आशिष फाटक: तुमचा व्यवसाय कुठल्या क्षेत्रात मोडतो?
विद्या आणि अवधूत: आमचा व्यवसाय खाद्यसंस्कृती क्षेत्रात आहे.
आशिष फाटक: कोणती उत्पादने किंवा सेवा देता तुम्ही?
विद्या आणि अवधूत: आमचं सर्वात जास्त विकलं जाणारं उत्पादन म्हणजे “दारजेदार गुळाचा खरवस”. त्याव्यतिरिक्त घरगुती मसाले – गोडा मसाला, सारस्वत मसाला, मालवणी मसाला, थालीपीठ भाजणी आणि रोज सकाळचा नाश्ता व दुपारचं जेवण आम्ही देतो.
आशिष फाटक: ग्राहकांचं सर्वात आवडतं प्रॉडक्ट कोणतं?
विद्या आणि अवधूत: नक्कीच गुळाचा खरवस!
आशिष फाटक: तुम्ही कोणत्या समस्येवर उपाय देता?
विद्या आणि अवधूत: 100% घरगुती पारंपरिक चव – जी हल्ली मिळणं कठीण आहे, ती आम्ही देतो.
आशिष फाटक: ग्राहकांना तुमच्या सेवेत काय विशेष वाटतं?
विद्या आणि अवधूत: आमचं Quality आणि Quantity दोन्ही उत्तम असतं, हेच त्यांना भावतं.
आशिष फाटक: तुमचा व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा कसा आहे?
विद्या आणि अवधूत: आम्ही पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करतो आणि सूर्यफूल व शेंगदाणा तेलच वापरतो. ती चव सहज मिळत नाही.
आशिष फाटक: तुमचा व्यवसाय आमच्या वाचकांपैकी कोणाला उपयुक्त ठरू शकतो?
विद्या आणि अवधूत: आम्ही घरी बसून काम करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काम देण्यास तयार आहोत.
आशिष फाटक: आजपर्यंत किती लोकांनी तुमची उत्पादने घेतली आहेत?
विद्या आणि अवधूत: बरेच आहेत. नक्की आकडा सांगणं कठीण आहे.
— प्रेरणा आणि प्रवास
आशिष फाटक: तुम्ही किती वर्षांपासून हा व्यवसाय करता?
विद्या आणि अवधूत: या ऑगस्टमध्ये 5 वर्षं पूर्ण होतील.
आशिष फाटक: व्यवसाय सुरु करण्यामागची प्रेरणा काय होती?
विद्या आणि अवधूत: मराठी भाषा आणि पदार्थांकडे समाजाचा काहीसा दुर्लक्ष आहे. त्यांना हक्काचं स्थान आणि मार्केट मिळायला हवं – हा हेतू होता. उदा. थालीपीठ – जी आज उच्चवर्गातही दिसतं, पण त्याच्या मुळाचा सन्मान हवा होता.
आशिष फाटक: या प्रवासात कुणाचा पाठिंबा होता?
विद्या आणि अवधूत: आमचं कुटुंब आणि पार्टनर – यांचा खूप मोठा आधार आहे.
— विकास आणि पुढची दिशा
आशिष फाटक: व्यवसायाची माहिती तुम्ही लोकांपर्यंत कशी पोहोचवता?
विद्या आणि अवधूत: फेसबुक अॅड्स आणि WhatsApp जाहिरातीद्वारे.
आशिष फाटक: भविष्यात काही नवीन प्रॉडक्ट्स येत आहेत का?
विद्या आणि अवधूत: हो, आमच्या मनात काही कल्पना आहेत. आणि यावेळी मोठ्या स्तरावर जाण्याचा विचार आहे.
हाच होता *Swadart Foods* चा स्वादीष्ट आणि प्रेरणादायी प्रवास!

Click to reveal phone number.
Swadart Foods – Vidya Gogate & Avdhut Gaitonde
Address: Gogatewadi, Goregaon (E), opp. Sanmitra mandal School, Mumbai – 63.
Submit your review | |
1 2 3 4 5 | |
Submit Cancel |